सोलापूर शहरामध्ये मागील काही दिवसांमध्ये दिवसा व रात्रीच्या वेळी एका विशिष्ट पध्दतीने बंद घराची कडी, कोयंडे व कूलूपे तोडून, घरफोडी चोरीचे प्रकार घडल्याने विजापूर नाका व एमआयडीसी पोलीस ठाणेस गुन्हे दाखल झाले होते. विशेषतः माहे ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर २०२१ या महिन्यात घरफोडी चोरी गुन्ह्याचे प्रमाण वाढले होते. या पाश्वभुमीवर पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी नमुद गुन्हे उघडकीस आणणेबाबत वेळोवेळी मार्गदर्शन व आदेशीत केले होते..
दि. ०५/०१/२०२२ रोजी मालाविषयी गुन्ह्यातील अभिलेखावरील व पाहिजे फरारी आरोपीतांचा शोध व मालाविषयी गुन्हे उघडकीस आणण्याचे दृष्टीने पेट्रोलिंग करीत असताना गुन्हे शाखेचे अंमलदार पोना विनायक बड़े यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरुन घरफोडी चोरी गुन्हयातील अभिलेखावरील आरोपी नामे अनंत ऊर्फ छोटा अंत्या दौलत चव्हाण, वय-३८ वर्षे, रा. मु.पो. कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर व त्याचे सोबतचा आणखी एक साथीदार नामे किसन कुबेर काळे, वय-२२ वर्षे, धंदा मजुरी रा. कुंभारी पारधी कॅम्प, ता. दक्षिण सोलापूर जि. सोलापूर या दोघांना ताब्यात घेवून त्याचेकडे तपास केला असता ते दोघे व त्यांचे आणखी दोन साथीदार असे चौघांनी मिळुन, सोलापूर शहरात दिवसा व रात्रीच्या वेळी विजापूर नाका पोलीस ठाणे हददीत ११ ठिकाणी व एम.आय.डी.सी पोलीस ठाणे हददीत ०६ ठिकाणी अशा एकुण १७ ठिकाणी घरफोडया व जबरी चोरी केल्याची कबुली दिली. त्यामुळे त्या दोघांना दि. ०५/०१/२०२२ रोजी १५:३० वा. अटक करण्यात आली असुन त्यांचे अन्य दोन साथीदाराचा शोध सुरु आहे.
या गुन्हयातील अटक आरोपी नामे अनंत ऊर्फ छोटा अंत्या दौलत चव्हाण, वय-३८ वर्षे, रा. मु.पो. कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर व आरोपी नामे किसन कुबेर काळे वय २२ वर्षे, धंदा मजुरी रा. कुंभारी पारधी कॅम्प, ता. दक्षिण सोलापूर जि. सोलापूर याचे अंगझडतीत व घरझडतीमध्ये एकुण ३७० ग्रॅम (३७ तोळे) सोने व १३०० ग्रॅम (१ किलो ३०० ग्रॅम) चांदी एकूण रु.१०,४८,१५०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करून विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीतील १ जवरी चोरीचा व १० घरफोडीचे गुन्हे तसेच एमआयडीसी पोलीस ठाणेकडील ६ घरफोडीचे गुन्हे असे एकुण १७ गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.
वरील दोन्ही सराईत गुन्हेगारांकडून स.पो.नि. नंदकिशोर सोळुंके व त्यांचे पथकातील पोह दिलीप नागटिळक, संतोष फुटाणे, पोना शितल शिवशरण, सचिन बाबर, विनायक बर्डे, कृष्णात कोळी यांनी कौशल्याने वरील गुन्ह्याची उकल करून व मुद्देमाल हस्तगत करून सदरची कारवाई केली आहे.

















