सोलापुरात भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर हे बुधवारी दौऱ्यावर होते पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली दुपारच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून राज्यभरातून टीकेची झोड उठली.
याचे पडसाद उमटले सायंकाळी घोंगडे वस्ती परिसरात त्यांच्या गाडीवर एका युवकाने मोठा दगड फेकला आणि काच फोडली. यानंतर बराच गोंधळ उडाला कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृहात घोषणाबाजी केली.
पोलिस आयुक्तालयात ठिय्या आंदोलन केले पोलीस आयुक्तांच्या आश्वासनानंतर कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले दरम्यान गोपीचंद पडळकर यांनी फेसबुक वर संशयित तरुणाचा फोटो आमदार रोहित पवार यांच्या सोबतचा टाकून प्रस्थापितांचा बहुजनांवर हमला पण आम्ही भ्याड हल्लाला घाबरणार नाही असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.


















