सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ग्रामीण जिल्हाप्रमुख अमर पाटील यांना 13 जून 2023 रोजी पोलीस आयुक्त यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भ निवेदन देण्यासाठी गेले असता बेकायदेशीरपणे दडपशाहीने अटक करण्यात आले. अमर पाटील यांची लगेच सुटका करावी आणि संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, सहसंपर्कप्रमुख उत्तम प्रकाश खंदारे शहर प्रमुख विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, शिवसेना जिल्हाप्रमुख अमर पाटील हे दिनांक 13/6/ 2023 रोजी सायंकाळी 7 ते 8 दरम्यान पोलीस आयुक्त कार्यालय येथे हायकोर्टाच्या निर्णयाबाबत एक निवेदन देण्यासाठी गेले असता कोणतीही पूर्व सूचना किंवा नोटीस न देता बेकायदेशीरपणे अटक केली आहे. ते स्वतः जिल्हा परिषद सदस्य होते, त्यांची कुठली गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही तरीसुद्धा एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे त्यांना अटक केली आहे. यामुळे शिवसेना पक्षाची बदनामी करण्याचा राजकीय हेतू स्पष्टपणे दिसून येत आहे. तरी त्यांना झालेली अटक बेकायदेशीर असून यासाठी संबंधितावर चौकशी करून कारवाई करण्यात यावी व अमर पाटील यांची सुटका करण्यात यावी असे नमूद करण्यात आले.
उत्तम प्रकाश खंदारे, पुरुषोत्तम बरडे व विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखालील निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात प्रिया बसवंती, संतोष पाटील, दत्तात्रय वानकर ,भीमाशंकर म्हेत्रे, अतुल भंवर, संताजी भोळे, आनंद बुक्कानुरे, राजू बिराजदार, शरणराज केंगनाळकर, योगीराज पाटील, संतोष घोडके, धर्मराज बगले, रेवण पुराणिक, उज्वल दीक्षित, भागवत जोगदंनकर, आकाश गंगादे, राकेश मालकोटे, लिंगराज गुले यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.


















