सोलापूर : शहरातील सिव्हिल हॉस्पिटल येथील एका डॉक्टर विद्यार्थीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आकाश संतोष जोगदंड वय 24, राहणार चौसाळा जिल्हा बीड असे त्या डॉक्टर विद्यार्थ्यांचे नाव आहे. मयत विद्यार्थी हा डॉक्टर वैंशपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे येथे एमबीबीएस चा शिक्षण घेत होता.
सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता सावरकर मैदान जवळील हॉटेल रितेशच्या एका रूम मध्ये या शिकाऊ डॉक्टरने तोंडाला कागद व चिकटपट्टी लावून नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला.
डॉक्टर विद्यार्थीने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट असून मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. डॉक्टर विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकच खडबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांनी सिव्हील हॉस्पिटल मधील शवविच्छेदन गृहाजवळ मोठी गर्दी केली आहे.
यापूर्वीही सिव्हील हॉस्पिटल मध्ये एमबीबीएस मध्ये शिकत असलेल्या शिकाऊ डॉक्टर चैतन्य धायफुले याने मेडीकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली होती.



















