नांदेड जिल्हयातील बोंढार या गावी अक्षय भालेराव यांचा, निघृण हत्या करण्यात आले आहे. सदरची हत्या ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून त्याचा रोष व राग मनात धरुन तिथल्या जातीवादी गावगुंडांनी त्यांची हत्या केल्यानंतर सोशल मिडीयामध्ये हत्या केल्याचे निर्भीडपणे जाहीररित्या कबुली देत आहेत. या सर्व आरोपींना तातडीने पोलीस कारवाई करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड, शहराध्यक्ष प्रशांत गोनेवार, अनिरुद्ध वाघमारे, महीला अध्यक्ष पल्लवी सुरवसे, रवी थोरात, जालिंदर चंदनशिवे, भाई राजा सोनकांबळे, श्रीनिवास संगेपाग, भोगपा पुजारी, नागसेन गायकवाड, विजय गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या निवेदनात केलेल्या मागण्या खालील प्रमाणे आहेत.
१) स्वतंत्र जलद गती मे. न्यायालयात सदरचे प्रकरण घेवून तातडीने न्यायलयीन प्रक्रिया पूर्ण करुन सक्षम सरकारी वकील देणे बाबत.
२) संबंधीत सर्व आरोपींना सदरच्या हत्या संदर्भात फाशीची शिक्षा होण्यासाठी सर्व कायदेशिर प्रक्रिया पूर्ण करणे बाबत.
३) सदरच्या सर्व आरोपीचे चार्जशिट हे भक्कम पध्दतीने तसेच आरोपी सुटणार नाही याची दक्षता घेवून चार्जशिट तयार करणे बाबत.
४) सदर सर्व आरोपी विरोधात अॅट्रासिटी अॅक्ट सर्व कलमे लावून सदर हत्ये संदर्भात कारवाई करणे बाबत.
५) सर्व आरोपींना शिक्षा लावे पर्यंत कोणतेही साक्षीदार फुटता कामा नये मे. कोटांकडून या प्रकरणास विशेष लक्ष देवून दक्षता घेणे गरजेचे आहे.
६) अक्षय भालेराव यांच्या कुटूंबाचे संपूर्ण पुनर्वसन व ५० लाखाची शासनाकडून मदत जाहीर करणे बाबत. सदर या हत्ये संदर्भात मा. शासनाने लक्ष घालुन सर्व दलित समाजांना न्याय दयावा तसेच सदरचे प्रकरण सामाजिक व्यवस्थेचे हत्या करणारे आहे.
वंचित बहुजन आघाडी संपूर्ण शहर, जिल्हा या प्रकरणात न्याय मिळे पर्यंत काम करणार तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल व त्याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासनावर राहील. असा इशारा देण्यात आला आहे.


















