सोलापूर : अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये नसलेल्या महेश कोठे यांनी काँग्रेसला धक्के देत काही ज्येष्ठ नेत्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करून घेतले, त्यामुळे समोर बोलत नसले तरी काँग्रेस पक्ष काहीसा disturb झाल्याचं चित्र आहे. कुणी आता काहीही बोलू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमानंतर आमदार ताई काँग्रेस भवनात आल्या, त्यांनी कार्यकर्त्यांना “धीर” देण्याचा प्रयत्न केला. याचवेळी युवक अध्यक्ष बाबा करगुळे यांनी आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी जोशाने भाषण केले, ताई सोलापूरात आपला खरा शत्रू राष्ट्रवादी काँग्रेसच आहे, आपण त्यांच्या नाराजीचा फायदा घेऊ,त्यांचेही कार्यकर्ते फोडू. मात्र बाबाचे भाषण आमदार ताई आणि पक्षात आणखीच वजन वाढलेल्या भाऊंनी जास्त मनावर घेतले नसल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून आले.पहा करगुळे काय म्हणाले…..


















