सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी लष्कर भागातील मोची समाजाचा मोठा भाग असलेल्या सतनाम चौक या ठिकाणी राष्ट्रवादीसाठी एक तास व पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी केले होते. या कार्यक्रमात मोची समाजातील काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
या कार्यक्रमाला माजी महापौर महेश कोठे, पक्षनिरीक्षक शेखर माने, शहराध्यक्ष भारत जाधव, प्रदेश उपाध्यक्ष संतोष पवार, महिला विभागाच्या कविता म्हेत्रे, महेश गादेकर, यु एन बेरिया, जनार्दन कारमपुरी, नलिनी चंदेले, शंकर पाटील, सुनिता रोटे, संगीता जोगधनकर, बसवराज बगले, सनी म्हेत्रे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खरटमल म्हणाले, आज पर्यंत मी तुमच्याकडे हात घेऊन येत होतो परंतु आता घड्याळ घेऊन येत आहे. आपणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोलापुरात बळकट करायचा आहे त्यासाठी तुम्ही लोकांनी साथ द्यावी असे आवाहन केले.



















