सोलापूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला यशस्वी नव वर्ष पूर्ण झाले आहेत त्या प्रत्यार्थ त्यांनी देशात राबवलेल्या कल्याणकारी योजना त्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोदी@9 या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे नियोजन देशभरात करण्यात आले आहे.
काँग्रेस पक्षातून नुकतेच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेले मन्सूर गांधी यांनी भाजपाच्या अल्पसंख्यांक मेळाव्याचे आयोजन हॉटेल प्रथम येथे केले होते.
या मेळाव्याला भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, अल्पसंख्यांक प्रदेश चिटणीस एडवोकेट जहीर चौधरी, डॉक्टर रफिक सय्यद, संघटक सरचिटणीस रुद्रेश बोरामणी, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, अल्पसंख्यांक प्रदेश कार्यकरीणी सदस्य जाकीरहुसेन डोका, अल्पसंख्यांक शहर मोहसीन शेख, मंडल अध्यक्ष सुनील गोडगाव, माजी रेल्वे सल्लागार समिती सदस्य प्रवीण कामळे, रमेश यन्नम, अल्पसंख्यांक शहर सरचिटणीस जाकीरभाई सगरी, अ.करीम सय्यद, हाजी अकील नालवार, अ. रहेमान काजी, आदम शेख, जावीद मुलाणी आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मन्सूर गांधी म्हणाले, मुस्लिम समाजाच्या मनात जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टीबद्दल वाईट भावना निर्माण झाल्या आहेत, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल साठ विविध प्रकारच्या योजना मुस्लिम समाजासाठी आणल्या आहेत. या योजनांची माहिती मुस्लिम समाजात जाणे गरजेचे आहे त्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.




















