गेल्या चार वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीने सोलापूर शहरातील जनतेला भाजपने खोटे आश्वासन देऊन महापालिकेत सत्तेवर आला पण भाजपने सोलापूरची काय वाट लावली हे सांगायची गरज नाही. दोन माजी मंत्र्यांची भांडणे, खड्डेमय सोलापूर, प्रशासनावर धाक नसलेला भाजपा, स्थायी समिती चेअरमन नेमु न शकलेला भाजपा, पाण्याची क्षमता असूनही पाच दिवसायाआड पाणी देणारा भाजपा, स्मार्ट सिटी च्या नावाखाली पूर्ण सोलापूरवासीयांना गेल्या पाच वर्षापासून नरक यातना भोगायला लावणारा भाजपा, जाती-धर्मांमध्ये तिढा निर्माण करणारा भाजपा, महागाई बेकारी वाढवणारा भाजपा, बोगस जातीच्या दाखल्यावर खासदार देणारा भाजपा, कोरोना संकटकाळात जनतेला गरज असताना बिळात लपणारा भाजपा, केंद्रात व सोलापूर महानगरपालिकेमध्ये सत्तेत, दोन खासदार, आठ आमदार असलेल्या भाजपने सोलापूरची काय प्रगती केली हे सोलापूरकर बघतच आहेत. जनता सध्या केंद्रातील व सोलापूर महापालिकेतील भाजपच्या सत्तेला कंटाळली असून जनमत काँग्रेस विचाराकडे मोठ्या संख्येने आकर्षित होत आहे. काँग्रेस पक्ष हा भाजपला एकमेव पर्याय असून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी बूथलेवल वर काम करणार, टप्प्याटप्प्याने विधानसभा, ब्लॉक, प्रभाग, वार्ड, बुथवाईज बैठका घेणार, वैयक्तिक गाठीभेटीवर भर देणार, प्रचाराचा नियोजन करणार, सगळे ब्लॉक फ्रंटल सेलची कार्यकारिणी जाहीर करणार, काँग्रेस विचाराचे सरकार आणि सोलापूर महापालिकेत सत्तेवर येण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन एक दिलाने काम केले पाहिजे. माजी आमदार प्रकाश यलगुलवार माजी, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, सोलापूर शहर कॉंग्रेस अध्यक्ष प्रकाश वाले व काँग्रेसचे सर्व नेतेमंडळी यांच्या मार्गदर्शनानुसार काँग्रेस पक्ष संघटना बळकट करणार तसेच तरुण वर्गापर्यंत काँग्रेसचे विचार पोहोचवणार, समाजातील प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन जाणारा काँग्रेस पक्ष असून सोलापूर शहर काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करून काँग्रेस पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी व महापालिकेवर काँग्रेसचा महापौर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सोलापूर शहर कॉंग्रेस कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार यांनी सांगितले आहे.
सोलापुरात बांधकाम व्यवसायिकाला पाच कोटीला फसवले ; उच्चभ्रू कुटुंबावर गुन्हा
सोलापुरात बांधकाम व्यवसायिकाला पाच कोटीला फसवले ; उच्चभ्रू कुटुंबावर गुन्हा सोलापूर : सुमारे चार हेक्टर अविकसित जागा एम ओ यु...