सोलापूर : सोलापूर शहरात काँग्रेस पक्षाने घेतलेल्या महानिर्धार शिबिरामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी स्वबळाची भाषा केली. सोलापूर लोकसभा मागणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची माढयावर लक्ष ठेवून बोलती बंद केल्याचं पाहायला मिळालं.
पटोले म्हणाले, मला देशाचा पंतप्रधान राहुल गांधी यांना पाहायचे आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. सुशीलकुमार शिंदे हे पुन्हा लोकसभेत दिसले पाहिजे पण केवळ सोलापूर लोकसभाच नाही तर आपल्याला माढा पण जिंकायची आहे, कुणीही भुट्टा येथे येऊन सांगून जाईल त्याच्याकडे लक्ष देऊ नका, प्रणितीताई मंत्री झाल्या पाहिजे पण ते कधी, जेव्हा लोकसभा निवडणुकीनंतर आपल्याला सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभेच्या जागेवर काँग्रेस आमदार करावा लागेल असे वक्तव्य करत त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरली.
प्राध्यापक अशोक निंबर्गी यांचे काँग्रेसमध्ये स्वागत करत अशोक भाऊ, तुम्ही चांगल्या दिवशी काँग्रेस पक्षात प्रवेश केलात, पक्षात चांगले काम करा तुम्हाला वाटेल खऱ्या अर्थाने तुम्ही देशभक्त आहात आणि तुम्ही खरे मर्द आहात म्हणून काँग्रेसमध्ये आलात या शब्दात त्यांनी त्यांचे कौतुक केले. निंबर्गी यांनी महापालिकेत काम केले आहे त्यांनी भाजपचा अजेंडा आपणांसमोर मांडला त्यापेक्षाही अधिक चांगल्या पद्धतीने ते मांडू शकतात असे ही ते म्हणाले.

















