श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळा निमित्त शहरात अनेक मंडळांनी मिरवणुकांचे आयोजन केले होते. रयतेचे राजा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी सहा जूनला राज्याभिषेक सोहळ्यासाठी भव्य दिव्य मिरवणुकीचं जल्लोषपूर्ण वातावरणात मिरवणुकीचे डॉलभीसह आयोजन करण्यात येत असते.
मागील अनेक महिन्यांमध्ये सोलापूर शहरात प्रत्येक महापुरुषांच्या समोर डॉल्बीच्या मिरवणुका मोठ्या प्रमाणात आयोजन होत असल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये नाराजीचे भावना व्यक्त होत होती, महापुरुषांच्या मिरवणुकीमध्ये डॉल्बीवर बंदी यावी किंवा त्या मिरवणुका टाळायला हव्या अशी भावना सर्व स्तरातील सोलापूरकर सोशल मीडिया विविध प्रसारमाध्यमांमध्ये व्यक्त करत होते.
महेश गादेकर व मनोज गाडेकर यांच्या मार्गदर्शनाने व संस्थापक दिपक चव्हाण कार्यरत असणाऱ्या रयतेच्या राजा प्रतिष्ठाने एक आदर्शवत पुढाकार घेऊन यंदाच्या वर्षी डॉल्बीयुक्त मिरवणूक रद्द करून संपूर्णपणे पारंपरिक ढोल ताशा पथक, हलगी पथक, भव्य दिव्य हलता देखावा सादर केले तसेच ऐनवेळीच्या नियोजनात पत्रा तालीम युवक मंडळाच्या वतीने लेझीमचा बहारदार डाव काही तासातच नियोजन करून आज या ठिकाणी सादर करण्यात आला.
आज पुनश्च एकदा पत्रा तालमीतील रयतेच्या राजा प्रतिष्ठानने डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्यासह काढलेला मिरवणुकीचा निर्णय अतिशय स्तुत्य उल्लेखनीय आणि प्रशंसनीय आहे. कदाचित अनेक तरुणांना इतक्यात हा निर्णय रुचणार नाही परंतु भविष्यकाळात या मंडळांनी घेतलेल्या पुढाकाराचं निश्चितच सर्व सोलापूरकर कौतुक करून समाधान व्यक्त करतील आणि इतरही सर्व मंडळ महापुरुषांच्या मिरवणुकीमध्ये डॉल्बीला फाटा देत सर्व भारतीय पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन देत राष्ट्रपुरुषांना अभिप्रेत असलेले कार्य आणि विचार घेऊन मिरवणुकीची भव्य दिव्य आयोजन करतील अशी अपेक्षा मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली.
याप्रसंगी माजी उपमहापौर पद्माकर काळे, सूर्यकांत पाटील, श्रीकांत घाडगे, नवनाथ बन्ने, शेखर फंड व सर्व जेष्ठ, युवक पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



















