भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या हे रविवार 17 ऑक्टोबर रोजी सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मागील दोन महिन्यात सोमय्या हे दुसऱ्यांदा सोलापूर दौऱ्यावर येत असून त्यांचे विविध कार्यक्रम या दौर्यात आहेत
यापूर्वी किरीट सोमय्या हे सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी महानगरपालिकेमध्ये पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती, यानंतर सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातून अनेक तक्रारी सोमय्या यांच्यापर्यंत गेल्या होत्या त्यामध्ये विशेष करून जिल्हा परिषदेच्या अनुशंगाने काही तक्रारी त्यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत.
रविवार सकाळी सात वाजता रेल्वेने ते सोलापूर रेल्वे स्थानकावर येथील त्यानंतर ते हॉटेल बालाजी सरोवर या ठिकाणी जातील. सकाळी साडेआठ वाजता ते शासकीय विश्रामगृहावर येथील या ठिकाणी एक तास भर कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतील. सकाळी साडेनऊ वाजता माजी उपमहापौर शशिकला बत्तुल यांच्या प्रभागात साईबाबा चौक या ठिकाणी विविध विकास कामांचे उद्घाटन सोमय्या यांच्या हस्ते होणार आहे.
त्यानंतर अकरा वाजता शांतीसागर मंगल कार्यालय या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांचे चर्चासत्र होणार आहे दुपारी एक वाजता ते होटगी रोड वरील स्वयंसेवक केशवभाई रांभिया यांच्याकडे भोजनाला जातील. त्यानंतर दोन वाजता सांगोलाकडे जाणार आहेत त्याठिकाणी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या कार्यकर्ता चर्चासत्राला उपस्थिती लावतील, पाच वाजता त्याच ठिकाणी पत्रकार परिषद होईल यानंतर ते सोलापूरकडे प्रयाण करतील आणि रात्री रेल्वेने ते मुंबईला जातील असा किरीट सोमय्या यांचा दौरा असून या दौऱ्यात हे कोणता बॉम्ब टाकणार याकडे मात्र संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिल आहे.
















