सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्र १ शेळगी भागात अमरनाथ बिराजदार पाटील मित्रपरिवार यांच्या वतीने मोदी_@9 विशेष जनसंपर्क अभियान मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नंदिकेश मंदिरात महादेवाची पूजा करून करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक अमर बिराजदार यांनी केले. ते म्हणाले की,भारतीय जनता पार्टीच्या वतीने 1 जून ते 30 जून दरम्यान सुरू असणाऱ्या या अभियानात आपला देखील खारीचा वाटा असावा या करिता भाजप कार्यकर्ता म्हणून माझ्या शेळगी भागात या कार्यक्रमाचे आयोजन केले व भागातील नागरिकांशी चर्चासत्र तथा स्नेहभोजन आयोजन केले आहे.
मोदी @9 या कार्यक्रमाविषयी माहिती भाजयुमोचे अक्षय अंजिखाने यांनी दिली. ते म्हणाले की,भारतीय जनता पार्टीच्या वतीने 1 जून ते 30 जून या कालावधीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारने 9 वर्षाच्या कार्यकाळात देशात केलेली कामगिरी सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपच्या बूथ प्रमुखपासून ते राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या पर्यंत सर्वांनी जनतेत जाऊन प्रचार व प्रसार करायला सांगितले असून, सुरेश अण्णा यांनी घेतलेल्या कार्यक्रमानंतर शहर उत्तर मतदारसंघात हा दुसरा कार्यक्रम असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले जेष्ठ नेते रामचंद्र जन्नु यांनी आपले मनोगत व्यक्त केले, अमरनाथ बिराजदार यांनी शेळगी परिसरात आयोजित केलेल्या या उपकर्माप्रीत्यर्थ त्यांचे कौतुक करावे तितके कमी असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वर्षाच्या कार्यकाळात झालेली कामगिरी प्रत्येक प्रभागात साजरी झाली पाहिजे याचे प्रेरणादायी उदाहरण आजचे कार्यक्रम असल्याचे सांगत भाजपचा जनसंघपासून सुरू झालेला इतिहास व नरेंद्र मोदी सरकारच्या सुशाशनाची कामगिरी त्यांनी सांगितली.
जेष्ठ नेते सुरेश पाटील म्हणाले की, कोणतेही राजकीय पद नसताना सुद्धा संघटनेचे काम व सामाजिक कार्य अमर बिराजदार हे अगदी जोमाने करतात व अमर सारख्या युवा नेतृत्वामागे शेळगी भागातील जनतेने पाठीशी उभ राहिले पाहिजे असे सांगत केंद्र सरकारच्या काळात सोलापूरात झालेल्या विकासाची गाथा वाचून दाखवत पुन्हा नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री करण्यासाठी आपण सर्वांनी साथ द्यावी असे प्रतिपादन केले.
माजी सरचिटणीस हेंमत पिंगळे यांनी आपल्या मनोगतात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून दलाली कशी बंद पडली व सामान्य जनतेच्या खात्यात कशा पद्धतीने थेट व संपूर्ण रक्कम पोहोचत आहे या पारदर्शकतेचे उदाहरण सहित माहिती दिली व अमर बिराजदार यांनी घेतलेल्या @9 मोदी अभियाने सर्वांनी अनुकरण करून सर्व पक्षाचे नेते पदाधिकारी राबवावे असे आवाहन केले.
मोदी @9 या अभियानाचे शहर उत्तरचे प्रमुख सुरेश चिकळली यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळात रस्ते, विमानतळ, शिक्षण व सर्वच क्षेत्रात कशा पद्धतीने वृद्धी झाली याची माहिती उदाहरण सहित दिली.
चन्नवीर चिट्टे यांनी केंद्र सरकारने सोलापूरच्या विकासासाठी किती मोठा निधी उपलब्ध करून दिला याची आकड्यासहित माहिती देत पुन्हा नरेंद्र मोदी हे संपूर्ण बहुमताने सत्तेत येतील असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमास अशोक कटके, महेश बिराजदार, सुरेश बेमपुरे, बसवराज मठपती, सागर बिराजदार, योगेश नष्टे, इंडे, गेनशीद अंबारे, महेश.ठेसे, निलेश वाले, बसवराज गडगे, संजय सराटे, कुमार बसमुंगे, अशोक राजमाने, रवि लोखंडे, अक्षय अजिंखाने, गुरूराज पदमगोंडा, महादेव यलशेट्टी, नागेश गडगे , सतिष पारेली, महेश जेऊर, बसवराज चडचण, बापु नागशेट्टी, राज राजमाने, धानप्पा दहिटणे, सचिन बिराजदार, सुनिल निर्बगी, हर्ष बिराजदार, अनिल.मठपती, गंगाधर झुरळे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर अतनुरे यांनी केले. आभार प्रदर्शन गंगाधर झुरळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मल्लिकार्जुन सावळगी पिनु करपे केदार बिराजदार विनोद गडगे श्रीकांत बेगमपुरे संतोष बगले अक्षय हुनगुंद श्रीकांत भरडे शुभम स्वामी विशाल खळबंडे सागर हुनगुंद ऋषीकेश पवार आदींनी परिश्रम घेतले.



















