सोलापूर (प्रतिनिधी) संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी ची बैठक मुंबई येथे पार पडून या बैठकीत सोलापूर शहर अध्यक्ष श्याम कदम यांची पुणे विभागीय अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
मुंबई येथील अतिथी सभागृहात संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय कार्यकारणीची बैठक पार पडली या बैठकीत निवडीचे नियुक्तीपत्र संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते व संभाजी ब्रिगेडचे महासचिव सुभाष बोरकर, प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर भोसले, आत्माराम शिंदे, सुधाकर मोडक, सचिन सावंत, देसाई अनिल पाटील, रमेश हांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. या निवडीबद्दल मराठा समाजसह सर्व बहुजन चळवळीतील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. या निवडीबद्दल संभाजी ब्रिगेड सोलापूर च्या वतीने सत्कार करण्यात आला.

















