सोलापूर -सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक सन २०१६ मध्ये मंजूर झाले असुन सदर स्मारक उभारणी व देखरेखीसाठी जिल्हाधिकारी सोलापुर यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेली स्मारक समिती दि. ६ एप्रिल २०२२ रोजी रद्द करण्यात आली आहे.
तरी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक उभारणी समिती तात्काळ नेमण्यात यावी. व राज्यातील इतर मागासवर्गीय यांची सामाजिक व आर्थिक उन्नती व्हावी यासाठी व इतर मागासवर्गात समाविष्ठ असलेल्या राज्यातील वीरशैव लिंगायत समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. व पहिल्या टप्यात पन्नास कोटी निधी मंजुर केलेला आहे. परंतु सदर निधी आज अखेर वितरीत झाला नाही.
तरी तात्काळ निधी वितरीत करुन कर्ज पुरवठा करणेस महामंडळास मान्यता देण्यात यावी. या मागणीचे पत्र लिंगायत समाजाचे नेते विजयकुमार हत्तुरे यांनी विधान भवनात सकल लिंगायत समाजाच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन दिले. याची दखल घेत विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी तात्काळ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री अतुल सावे यांच्याकडे आग्रही मागणी केली आहे. विधान भवनात मागणीचे पत्र देताना विजयकुमार हत्तुरे, मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत साळे, मंगळवेढ्याचे प्रतिष्ठित नागरिक अशोक चेळेकर, महात्मा बसवेश्वर ब्लड बँकेचे संचालक सचिन तूगावे आदी उपस्थित होते.