सोलापूर : गेली सहा महिन्यापासून सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतील ६०२ शिक्षक व कर्मचारी यांचा शालार्थ आय डी चा प्रश्न गाजत आहे.राज्यातील सर्व जिल्ह्यातील २० टक्के अनुदानित शाळांतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले परंतु सोलापूर जिल्ह्यातील १५ ते १६ वर्ष पूर्वीपासून विनावेतन कार्य करणाऱ्या शिक्षकांना वेतन मिळालेले नाही. ही बाब लाजिरवाणी आहे .विनावेतन काम करणाऱ्या शिक्षक व त्यांचे कुटुंबीय मरण यातना सहन करीत आहेत.त्यामुळे अशा शिक्षकांचा अंत पाहू नका, पाठीवर मारा, पोटावर मारू नका. अशी आर्त हाक महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघ आणि राज्य शाळा शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी यांनी पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक राजेंद्र आहिरे यांच्याकडे जिल्हा परिषदच्या शिवरत्न सभागृहात केली.
यावेळी पुणे विभागाचे शिक्षण उपनिरीक्षक राजेंद्र मिरगणे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, योजना शिक्षणाधिकारी सुलभा वटारे ,प्राथमिकचे शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले,जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. यावेळी महासंघाच्यावतीने उपसंचालक राजेंद्र आहिरे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड, जिल्हा अध्यक्ष प्रा युवराज भोसले, जिल्हा उपाध्यक्ष उपप्राचार्य प्रकाश शिंदे, प्रा अभिजित भंडारे, प्रा सुरेश महानूर, प्रा विजयकुमार बमनगे,राज्य शाळा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बामेश पाटील, संगमेश्वर निगदाळे,बसवराज तेगेळी, चंद्रशेखर पाटील इत्यादी पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.