सोलापूर : सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेतील अतिशय महत्त्वाचा विधी असलेला अक्षता सोहळा शनिवारी पार पडत आहे. तत्पूर्वी सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीने यंदा पहिल्यांदाच जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासाठी टेरेसवर ‘व्हीव्हीआयपी’ अशी सोय केली आहे.
त्यांच्यासाठी स्वतंत्र स्टेज मारण्यात आला असून तशी बैठक व्यवस्था ही करण्यात आली आहे. या अक्षता सोहळ्याला यापूर्वी अनेक मान्यवर मंत्री नेत्यांनी उपस्थिती लावली मात्र अशी सोय कधीच करण्यात आलेली दिसली नाही. सुशीलकुमार शिंदे हे देशाचे केंद्रीय गृहमंत्री असतानाही तेव्हाही तशी सोय नव्हती मात्र यंदा पालकमंत्री विखे पाटलांची देवस्थान पंचकमिटीने विशेष काळजी घेतल्याचे पाहायला मिळाले.
ज्या ठिकाणी पालकमंत्री यांची बैठक व्यवस्था आहे. त्या ठिकाणी केवळ प्रादेशिक चॅनल वाहिन्यांच्या पत्रकारांनाच वार्तांकन करण्यासाठी पोलिसांनी मुभा दिली आहे. स्थानिक पत्रकारांची मात्र अडवणूक होत असल्याने पत्रकारांमधून नाराजीचा सूर व्यक्त होत असून पोलिसांकडून पहिल्यांदाच असा दुजाभाव केल्या जात असल्याचे बोलले जात आहे.



















