सोलापूर : सोलापूरच्या निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांची उपसंचालक पर्यटन संचालनालय पुणे या ठिकाणी बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले दादासाहेब कांबळे हे नवे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून सोलापूरला येत आहेत.
शमा पवार यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये सुमारे पाच वर्षाहून अधिक कार्यकाळ सेवा केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी पदाच्या पूर्वी त्या माळशिरस तालुक्याच्या प्रांताधिकारी म्हणून कार्यरत होत्या. माळशिरस प्रांताधिकारी असताना त्यांनी कोरोनाच्या दोन्ही लाटेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज केले होते. तीन ऑगस्ट 2021 रोजी त्यांनी सोलापूर निवासी उपजिल्हाधिकारी पदाचा पदभार घेतला साधारण 25 महिने त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी पदाचा पदभार सांभाळला.