जिल्हा नियोजन समितीमध्ये झालेल्या चर्चेनुसार अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बंधारे दुरूस्तीबाबत बैठक घेण्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले होते. त्यानुसार सोमवारी पुणे येथील विधानभवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्ह्यातील नादुरूस्त बंधाऱ्याबाबत बैठक झाली. यावेळी पालकमंत्री भरणे, आमदार शहाजीबापू पाटील, प्रशांत परिचारक, माजी आमदार दिपक साळुंखे-पाटील, जलसंपदाचे कार्यकारी संचालक टी.एन. मुंडे, नगराध्यक्ष साधना भोसले, भगीरथ भालके, लतीफ तांबोळी, सोलापूरचे अधीक्षक अभियंता धीरज साळे उपस्थित होते. बंधारे दुरूस्तीसाठी 13.10 कोटींचा प्रस्ताव पालकमंत्री भरणे यांनी सादर केला. उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रस्तावाला तत्वता मान्यता दिली आहे. याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी देऊन नादुरूस्त बंधारे दुरूस्त करण्याचे आदेश दिले. भरणे यांनी नादुरूस्त बंधारे पावसाळ्यापूर्वी दुरूस्त न झाल्यास सर्व पाणी वाहून जाईल. शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पाणी राहणार नाही, असे पवार यांच्या निदर्शनाला आणून दिले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर केवळ दोनच दिवसात हा प्रश्न पालकमंत्र्यांनी मार्गी लावला याला आमदार संजय मामा शिंदे यांच्या मदतीची जोड मिळाल्याचे चित्र आहे.
सोलापूरचा ढाण्या वाघ आता ठाण्यात गाजणार ; ॲड. अमित आळंगे यांची….
सोलापूरचा ढाण्या वाघ आता ठाण्यात गाजणार ; ॲड. अमित आळंगे यांची.... येथील बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अमित आळंगे यांची ठाण्याच्या...