सोलापूर : चार दिवस रिसॉर्टमध्ये राहून पार्ट्या करून बिल न देता फसवणूक केल्याबद्दल दोघांविरोधात विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रदिप पाटील, रा. वेदांत अपार्टमेंट, सात रस्ता, सोलापुर, व सागर नाळे, भारती विदयापीठ, सोलापूर अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत.
मुकुद विठठल जाधव, वय ६० वर्षे व्यवसाय हॉटेल व्यवसाय यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी जाधव यांचे सोरेगाव याठिकाणी ग्रिनवुड रिसॉर्ट आहे, प्रदीप पाटील व सागर नाळे यांनी कोरोना लॉकडाऊन काळात दिनांक 16 मे 2021 ते 19 मे 2021 दरम्यान रिसॉर्टची 104 नंबर रूम बुक केली, दररोज १०-१२ मित्रांना बोलावुन घेवुन, चहा नाष्टा, जेवण करुन रूम भाडे व जेवणाचे असे 43 हजार 430 रुपये बिल झाले उद्या सकाळी आणुन देतो म्हणून जे निघून गेले ते पाच महिने झाले बिल दिले नाही, शेवटी फिर्यादीने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी 1 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला याचा तपास पोलीस नाईक घुगे करत आहेत.


















