सोलापूर : राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने तीन जिल्ह्याच्या नूतन पालक सचिवांची नियुक्ती केली असून विशेष म्हणजे या तिन्ही पालक सचिव महिला अधिकारी आहेत.
सोलापूर जिल्ह्याच्या पालक सचिवपदी जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारी तथा कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सोलापूरसह सांगली व रत्नागिरीच्या पालक सचिवांची नियुक्ती झाली असून त्यामध्ये सांगलीच्या पालक सचिवपदी प्रधान सचिव विनिता वेद सिंगल तर रत्नागिरीच्या पालक सचिवपदी प्रधान सचिव सीमा व्यास यांची नियुक्ती झाली आहे.
.jpg)



















