सोलापूर : जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे यांची अखेर बदली झाली आहे त्यांना पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी पदी नियुक्ती देण्यात आली आहे. लांडगे यांच्या जागेवर अधिकारी नियुक्त करण्यात आला नाही.
दरम्यान वर्षा लांडगे यांचा पदभार अन्नधान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे यांच्याकडे देण्यात आला आहे.
लांडगे रोहयो वर्धा या उपजिल्हाधिकारी पदावरून सोलापूर येथे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून २०२१ ला रूजू झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून चांगली कारकीर्द राहिली. १८ ऑक्टोबरला शासनाच्या आदेशानुसार त्यांची सेवा पुरवठा विभागाकडून मूळ महसूल व वन विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे.
मिनाज मुल्ला, उप जिल्हाधिकारी यांना उप विभागीय अधिकारी, दौंड-पुरंदर, जि. पुणे येथे पदस्थापना देण्यात आली आहे. आता संदर्भाधीन क्र. ४ येथील शासन निर्णयान्वये पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात दौंड येथे स्वतंत्र उप विभागीय कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. सबब, मिनाज मुल्ला, उप जिल्हाधिकारी हे उप विभागीय अधिकारी, दौंड, जि. पुणे या पदावर कार्यरत राहतील. त्यामुळे उपजिल्हाधिकारी वर्षा लांडगे यांना पुरंदरच्या उपविभागीय अधिकारी पदी नियुक्ती देण्यात आली आहे.