सोलापूर : इंडियन कौंसिल ऑफ ऍग्री कल्चर रिसर्च , कृषी अनुसंधान भवन नवी दिल्ली यांनी घेतलेल्या,” Veterinary Science P. G. कोर्स साठी AIEEA या परीक्षेत सोलापूरची सुवर्णकन्या कुमारी आकांक्षा दीपक पोतदार ही सर्व विद्यार्थ्यांमध्ये संपूर्ण देशात 28 वी आणि ईतर मागास वर्गीयांत देशात 13 वी आली आहे. तिच्या या नेत्रदीपक आणि दैदीप्यमान यशामुळे तिला P. G. कोर्ससाठी ती मागेल त्या ठिकाणच्या कॉलेज मध्ये तिला प्रवेश मिळणार आहे .
कुमारी आकांक्षाला इयत्ता 6 वी पासूनच प्राण्यांविषयी प्रचंड प्रेम असल्याने 12 वी नंतर तिने पशु वैद्यकीय शिक्षणासाठी BVSC साठी पशु वैदयकीय महाविद्यालय परभणी येथे प्रवेश घेतला . आकांक्षा ही BVSC परीक्षेत मेरिटमध्ये उत्तीर्ण असून , परभणीच्या पशु वैद्यकीय महाविद्यालयात 1 ली आली आहे .तिला पुढे WILD LIFE मध्ये करियर करायचे आहे .
या यशाचे श्रेय तिने वडील डॉ श्री दीपक पोतदार , आई प्रा. अस्मिता पोतदार , परभणी येथील मावशी , काका, भाऊ समाज कल्याण सहाय्यक आयुक्त अमित घवले, दीक्षित तसेच सर्व प्राध्यापक , मार्गदर्शक यांना दिले आहे.
आकांक्षा पोतदार हिच्या या घवघवीत यशाबद्दल सर्व सोनार समाजबांधव अभिनंदन व तिचे कौतुक करत आहेत. सुवर्णपुष्प संस्था महाराष्ट्र तर्फे २८ नोव्हेंबर २०२१ रोजी श्रीराम गोल्ड पॅलेस वाठार स्टेशन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे होणाऱ्या मान्यवरांची मांदियाळीत यशस्वीतांच्या सत्कार समारंभात तिचा यथोचित सत्कार होणार आहे.

















