सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी 8 ऑक्टोबर रोजी सोलापुरात शहर आणि जिल्ह्याच्या दोन्ही मेळाव्यामध्ये उत्तर प्रदेशातील लखिमपुर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मृत्यूच्या घटनेनंतर येणाऱ्या 11 ऑक्टोबर सोमवारी संपूर्ण महाराष्ट्र बंद करण्याचे कळकळीचे आवाहन केले होते, महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी हा बंद यशस्वी करावा कुठेही गोंधळ घालू नये पोलीस प्रशासनाला मदत करावी असे आवाहन केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी शासकीय विश्रामगृहावर राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने केला प्रमुखांची बैठक आयोजित केली होती.
या बैठकीला शहराध्यक्ष प्रकाश वाले हे आजारी असल्याने उपस्थित नव्हते त्यांनी कार्याध्यक्ष संजय हेमगडी यांना बैठकीला पाठवले हेमगडी हे शासकीय विश्रामगृहावर बराच वेळ बसले राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव आले आणि गेले हेमगड्डी यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांना फोन लावला ते ही आले नाहीत, शेवटी नाराज झालेल्या हेमगड्डी यांना पत्रकारांना चहापान करून तिथुन परतावे लागले.
रविवारी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी नेत्यांनी बैठक घेऊन हा बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संपूर्ण बाजारपेठेत फिरून व्यापारी संघटना यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते.
सोमवारी सकाळी नऊच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, महेश कोठे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे ही सर्व नेतेमंडळी मार्केट यार्डात गेली त्याठिकाणी व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याच्या तसेच लिलाव थांबवण्याची विनंती केली.
पुढे दहाच्या सुमारास शहरातील काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत उत्तर प्रदेश येथील घटनेचा तसेच केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला त्यानंतर काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आमदार प्रणिती शिंदे यांच्या सोबत काँग्रेस भवनात गेले तिथे त्यांची बैठक झाली विचारमंथन झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष पवार शहराध्यक्ष भारत जाधव महेश कोठे मनोहर सपाटे हे नेते बाजारपेठेत गेले नागरिकांना हात जोडून त्यांनी बंद दुकाने बंद करण्याची विनंती केली,
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे हे पार्क चौकात आपल्या कार्यकर्त्यांसोबत जाऊन बसल्याचे समजले. शरद पवार यांनी आवाहन करूनही सोलापुरात बंदला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही रस्त्यावर रिक्षा सुरू होते जिल्हा परिषद कोर्ट परिसरात दुकाने सुरू होती बऱ्याच बाजारपेठेतील दुकाने सुरू होती. राष्ट्रवादी तसेच शिवसेना आणि काँग्रेस पक्षाने बंद यशस्वी करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला.


















