सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक यांनी 1894 मध्ये पुण्यातील विंचूरकर वाडयात सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना करून या उत्सवाला संपूर्ण महाराष्ट्र।त लोकजागृतीचे व ज्ञानासत्राचे स्वरूप दिले टिळक सोलापुरात आल्यानंतर एकदा कै अप्पासाहेब वा र द यांनी त्यांना जुन्या फौजदार चावडी जवळील सिद्रामप्पा पसा रे आणि चं गळप्पा श्रीगिरी यांच्या घरातील गौरीसमोरील चित्ताकर्षक आरास पाहण्यासाठी व पानसुपारी कार्यक्रमासाठी नेले होते ही आरास पाहण्यासाठीलोक उत्साहाने येत असल्याचे दिसून आले
1885 मध्ये सोलापुरात शुक्रवार पेठेत सार्वजनिक आजोबा गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती याठिकाणी ही टिळकांनी भेट दिली होती त्यामुळे टिळकांच्या मनात सार्वजनिक गणेशोत्सवाचे बीज सोलापुरात रुजले असावे असा अनुमान काढला जातो सोलापुरात 1896 पासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची मुहूर्तमेढ रोवली गेली
पहिल्या वर्षी 5 ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु झाले नवी पेठ येथील मल्हारराव डंके वकील यांच्या वाड्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करण्यात आला होता त्याचवर्षी कस ब्यात मामासाहेब परिचारक वकील , बाबा पंडित , काळे, दीक्षित व कोंडाजीपंत साने यांच्या पुढाकारातून सार्वजनिक गणपती गणपती मंदिराजवळ सुरु झाला तिसरा गणेशोत्सव कै अप्पासाहेब वा र द , कै बंडप्पा अण्णा का डा दी व अब्दुलपुरकर यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आला होता कै जगदेवरॊ व शेटे यांच्या नेतृत्वाखाली मीठ गल्ली येथे व भुसार गल्लीत माधवराव महाराज यांच्या जागेत अशा पाच ठिकाणी सोलापुरात सार्वजनिक गणपती बसवण्यात आले अशी माहिती उपलब्ध आहे
त्याकाळात गणेशोत्सवात व्यख्यान , प्रवचन , कीर्तन आदी कार्यक्रम सादर केले जात असत त्यानंतर संगीत मेल्यासारख्या करमु णी कीच्याकार्यक्रमाचे आयोजन करण्यास सुरुवात झाली होती मेळ्यात देशभक्तीपर गीते , ई शभक्तीपर गीते व भावगीतांचा समावेश असे ब्रिटिश सरकारविरोधात गीतेही मेळ्यात सादर केली जात असत त्यामुळे काही कवींनी ब्रिटिशांचा रोषही ओढावून घेतला होता कवी कुंजविहारी , कवी संजीव दिवाकर मास्तर , सोनवणे मास्तर आदी कवींच्या रचना मेळ्यात सादर करण्यात येत असत
कवी संजीव यांचा महाराष्ट संगीत मेळा , शंकरराव जबडे , अक्कलकोटकर यांचा नूतन संगीत भूषण मेळा , किसनराव हैद्राबादकर यांचा बाल गजानन संगीत मेळा , रेवनसिधप्पा , बसवन्ती , गंगापा शिरसी यांचा जयभवानी संगीत मेळा पंचप्पा जिरगे व बनशेट्टी या चा श्रद्धानंद स गीत मेळा असे अनेक मेळे गणेशोत्सवात कार्यक्रम सादर करीत असत अशी सोलापूरची जुन्या काळातील परंपरा आहे



















