सोलापूर : सात ऑक्टोबर पासून देशामध्ये नवरात्र महोत्सवाला प्रारंभ होणार आहे आणि त्याच दिवसापासून सोलापुरातील सर्व मंदिरे धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सोलापूरची कुलस्वामिनी आई श्री रुपाभवानी मंदिरात नवरात्र महोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा होतो मागील वर्षी मात्र कोरूना च्या निर्बंधांमुळे भाविकांसाठी मंदिर बंद ठेवण्यात आले होते यंदा मात्र मंदिरे भाविकांसाठी सुरू राहणार आहेत मात्र सार्वजनिक स्वरूपात नवरात्र उत्सव साजरा करता येणार नाही मंदिरात मात्र सोशल डिस्टन्स ठेवून दर्शनासाठी परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान येणाऱ्या नवरात्र उत्सवात रूपाभवानी मंदिरात असे आहेत कार्यक्रम



















