Thursday, July 31, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरकरांना 170 एमएलडी पाणी रोज उपलब्ध होणार : आयुक्त शितल तेली उगले यांनी केली समांतर जलवाहिनीच्या कामाची पाहणी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
6 October 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर –सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत उजनी धरण जलाशय उद्भव  धरून पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आलेली आहे. सदर योजनेद्वारे सोलापूर शहरास दररोज १७० द. ल.ली. पाणी उपलब्ध होणार आहे. सदर योजनेत मुख्यत्वे धरण क्षेत्रात जॅकवेल बांधणे (४५ मी. X ३३ मी. x १८.५० मी.), पंपींग मशीनरी (११५० एच.पी. ६ नग), अशुद्ध पाण्याची दाब – नलिका (१५२४ मिमी व्यास १४ मिमी जाड एम.एस. पाईप लांबी २८.५० कि.मी.), बी.पी.टी. (क्षमता ६.५० लक्ष लिटर्स), अशुद्ध पाण्याची उतार नलिका (१४७३/१४२२/११६८ मिमी व्यास १२ मिमी जाड एम. एस. पाईप लांबी – ८१.५० कि.मी.) असे एकूण ११० कि.मी. पाईपलाईन, क्रासिंग्स (रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, ईतर रस्ते, कॅनाल, सीना नदी असे एकूण ६३ नग) इ. कामांचा समावेश आहे. 

हे काम १ जून २०२३ रोजी ठेकेदार पोचमपाड कन्स्ट्रक्शन कंपनी हैदराबाद यांना देण्यात आले आहे. सदर कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम पाहत आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावधी २१ महिने आहे (नोव्हेंबर २०२४ अखेर). सदर योजनेचा आकृतीबंध स्मार्ट सिटी हिस्सा रू. २५० कोटी, NTPC हिस्सा रू. – २५० कोटी, महाराष्ट्र शासन (नगरोत्थान)- ३८२.६८ कोटी आहे. 

कामाची सध्याची स्थिती :-जॅकवेल–१८.५० मीटर खोलीचे उत्खनन पूर्ण पीसीसीचे काम पूर्ण, राफ्ट फाउंडेशनसाठी स्टील बाइंडिंगचे काम प्रगतीपथावर आहे. पाईप पुरवठा –आजपर्यंत ११० कि.मी. पैकी ४६.२० कि.मी. पाईप्सचा पुरवठा करण्यात आला आहे.पाईप अंथरणे–आजपर्यंत ११० कि.मी. पैकी ३५.७० कि.मी. पाईप अंथरले. हायड्रॉलिक टेस्टिंग–आजपर्यंत एकूण १६ कि.मी. पाईप लाईनचे हायड्रॉलिक टेस्टिंग पूर्ण झाले आहे. क्रासिंग्स– राष्ट्रीय महामार्ग -4,राज्य महामार्ग 1,ईतर रस्ते-2, कॅनाल-5 पूर्ण झाले. यावेळी स्मार्ट सिटी मुख्य तांत्रिक अधिकारी तथा उपअभियंता व्यंकटेश चौबे, पोचमपाडचे रंगा राव, एम.जी.पी चे एम.एस हरीश , विजयकुमार नलावडे, अरुण पाटील, देविदास मादगुंडे आदी उपस्थित होते.

उजनी ते सोरेगाव पर्यंत ही जलवाहिनी टाकण्याची महत्त्वपूर्ण योजना आहे. सुरू असलेल्या कामाची हायड्रोलिक टेस्टिंग व गुणवत्तेची तपासणी केली.या कामासाठी पाईप पुरवठा सुरु आहे . वर्क ऑर्डर मधील कराराप्रमाणे नोव्हेंबर 2024 पर्यंत  काम पूर्ण करण्यात येणार असले तरीही त्यापूर्वीच हे काम पूर्ण करण्याचा शर्तीचा प्रयत्न राहणार आहे. यामुळे सोलापूरकरांना 170 एमएलडी पाणी रोज उपलब्ध होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले यांनी दिली.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात शिवसेनेने मागितला आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा राजीनामा ; पुरुषोत्तम बरडे यांची बोचरी टीका

Next Post

बापरे ! सोलापुरात एपीआयने राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

बापरे ! सोलापुरात एपीआयने राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या

ताज्या बातम्या

सोलापुरात राष्ट्रवादीची अनोखी स्पर्धा ; ‘महापौरांकडून अपेक्षा ‘ लिहा आणि व्यक्त व्हा

सोलापुरात राष्ट्रवादीची अनोखी स्पर्धा ; ‘महापौरांकडून अपेक्षा ‘ लिहा आणि व्यक्त व्हा

30 July 2025
काँग्रेसकडून सोलापूर जिल्ह्यासाठी लिंगायत चेहरा ; साहेबांचा समर्थक झाला जिल्हाध्यक्ष

काँग्रेसकडून सोलापूर जिल्ह्यासाठी लिंगायत चेहरा ; साहेबांचा समर्थक झाला जिल्हाध्यक्ष

30 July 2025
भाजपच्या आंदोलनाला काँग्रेसचे प्रत्युत्तर ; चेतन नरोटे यांनी देवेंद्र कोठे यांचे सगळेच काढले !

भाजपच्या आंदोलनाला काँग्रेसचे प्रत्युत्तर ; चेतन नरोटे यांनी देवेंद्र कोठे यांचे सगळेच काढले !

30 July 2025
खासदार प्रणिती शिंदे यांचे ते वक्तव्य ; आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूरकरांच्या वतीने मागितली माफी

खासदार प्रणिती शिंदे यांचे ते वक्तव्य ; आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूरकरांच्या वतीने मागितली माफी

29 July 2025
मंडल अध्यक्षांनी दिलेला सपत्नीक वारीतील फोटो फ्रेम पाहून जयाभाऊ भारावले !

मंडल अध्यक्षांनी दिलेला सपत्नीक वारीतील फोटो फ्रेम पाहून जयाभाऊ भारावले !

29 July 2025
जिल्हा परिषद कास्ट्राईब संघटनेने घेतली पालकमंत्र्यांची भेट ; जयकुमार गोरेंनी मागण्या घेतल्या ऐकून

जिल्हा परिषद कास्ट्राईब संघटनेने घेतली पालकमंत्र्यांची भेट ; जयकुमार गोरेंनी मागण्या घेतल्या ऐकून

29 July 2025
ज्येष्ठ पत्रकार इक्बाल शेख यांना मातृशोक

ज्येष्ठ पत्रकार इक्बाल शेख यांना मातृशोक

29 July 2025
पालकमंत्री जयकुमार गोरे यांची ‘सिंहासन’ला सदिच्छा भेट ; सुपरफास्ट बातम्यांचे केले कौतुक

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची ‘सिंहासन’ला सदिच्छा भेट ; सुपरफास्ट बातम्यांचे केले कौतुक

29 July 2025

क्राईम

सोलापूरच्या पोलीस आयुक्तांचा मोठा दणका ; सालार गॅंगवर मोक्का अंतर्गत कारवाई

सोलापूरच्या पोलीस आयुक्तांचा मोठा दणका ; सालार गॅंगवर मोक्का अंतर्गत कारवाई

by प्रशांत कटारे
26 July 2025
0

सोलापूरच्या पोलीस आयुक्तांचा मोठा दणका ; सालार गॅंगवर मोक्का अंतर्गत कारवाई सोलापूरचे पोलीस आयुक्त राजकुमार यांनी एक मोठी कारवाई करताना...

धक्कादायक ! हॉटेल सुगरणचे मालक वाघमोडे व चालक वाघचवरे ठार ; आयशर आणि ओमनी कारचा भीषण अपघात, झाला

धक्कादायक ! हॉटेल सुगरणचे मालक वाघमोडे व चालक वाघचवरे ठार ; आयशर आणि ओमनी कारचा भीषण अपघात, झाला

by प्रशांत कटारे
22 July 2025
0

धक्कादायक ! हॉटेल सुगरणचे मालक वाघमोडे व चालक वाघचवरे ठार ; आयशर आणि ओमनी कारचा भीषण अपघात, झाला सोलापूर :...

सोलापुरात पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात दाखल ; पती वकील असल्याची माहिती

सोलापुरात पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात दाखल ; पती वकील असल्याची माहिती

by प्रशांत कटारे
18 July 2025
0

सोलापुरात पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात दाखल ; पती वकील असल्याची माहिती सोलापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली...

काय ! आमिर खान खून खटला ; आरोपीस उच्च न्यायालयात जामीन

काय ! आमिर खान खून खटला ; आरोपीस उच्च न्यायालयात जामीन

by प्रशांत कटारे
11 July 2025
0

काय ! आमिर खान खून खटला ; आरोपीस उच्च न्यायालयात जामीन सोलापूर : विजापूर नाका मशीद जवळ दि.१६.०२.२०२३ रोजी आमिर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

Our Visitor

1828935
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group