माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या शिफ़ारसीनुसार महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी सोलापुर शहर महिला काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षपदी प्रमिला तुपलवंडे यांची निवड केली आहे. यांची माहिती सोलापुर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे पाठविली आहे.
तूपलवंडे यांना अनेक वर्षानंतर ही संधी मिळाली आहे. त्या काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या आहेत. कुमठा नाका भागात त्यांची चांगली ओळख आहे. तूपलवंडे या बौद्ध समाजातील आहेत. त्यांच्या या निवडीने काँग्रेस पक्षाने सर्वधर्मसमभाव जोपासल्याचे पाहायला मिळत आहे. 2019 सालच्या लोकसभा निवडणुकी वेळी समाजातील अनेक कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडी मध्ये गेले मात्र तूपलवंडे या काँग्रेस पक्षात ठाम राहिल्या.

















