सोलापूर : जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरात आपल्या कामकाजाला सुरुवात केली आहे रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांचे शासकीय विश्रामगृहावर आगमन झाले. यापूर्वीच चंद्रकांत दादांनी कोणताही हार, बुके, सत्कार स्वीकारणार नाही असे जाहीर केले होते.
दरम्यान महाराष्ट्र डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, शहराध्यक्ष प्रशांत कटारे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे स्वागत आगळ्यावेगळ्या पद्धतीने केले.
यावेळी सोलापूरी चादर भेट देऊन नव्या पालकमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, मोहन डांगरे, विक्रम देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार संपन्न झाला. सोलापुरी चादर पाहून पालकमंत्री दादांनी सत्काराला नकार दिला नाही.
यावेळी डिजिटल मीडिया संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विजय कोरे, शहर सरचिटणीस रामकृष्ण लांबतुरे, कार्याध्यक्ष परशुराम कोकणे, उपाध्यक्ष अभिषेक आदेप्पा, खजिनदार विकास कस्तुरे, सदस्य शरद पोतदार, मनोज भालेराव, एस बी गड्डम, अकबर बागवान, जहूर सय्यद यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.