Tuesday, March 10, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात 4 हजार शिक्षक मोर्चाने आले जिल्हाधिकारी कार्यालयावर ; महामोर्चात राजकीय नेत्यांचा समावेश

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 October 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 


सोलापूर – शाळाबाहय अशैक्षणिक कामे बंद करा व “आम्हाला फक्त शिकवु दया” ची आर्त मागणी करिता महाराष्ट्र राज्य प्राथ. शिक्षक संघाचे नेते संभाजी थोरात यांच्या आदेशानुसार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून  आज  राज्यभर शिक्षक संघाच्या वतीने आक्रोश महामोर्चा काढण्यात आला. याचाच भाग म्हणून  जिल्हा शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सुमारे 4000 शिक्षकांचा आक्रोश मोर्चा काढला. 

शिक्षकांच्या हातात या घोषणांच्या पाट्या होत्या जोरजोरात  दिल्या या घोषणा


बंद करा बंद करा…अशैक्षणिक कामे बंद करा, बंद करा बंद करा… खाजगीकरण बंद करा, आम्हाला फक्त शिकवु द्या…सरकारी शाळा टिकू द्या, संयुक्त शाळा योजना…बंद झालीच पाहिजे, शाळाबाह्य कामे काढून घ्या..आम्हाला फक्त शिकवू द्या, शिक्षण हक्क कायद्याचा…विजय असो, एक दोन तीन चार… शिक्षणहक्काचा जयजयकार, सगळीकडे एकच चर्चा…संघाचा निघालाय आक्रोशमोर्चा, शिक्षक एकजूटीचा…विजय असो, शिक्षक संघाचा…विजय असो, पेन्शन  आमुच्या हक्काची…नाही कुणाच्या बापाची, दारूची दुकानं गावात आली …गावातली शाळा बाहेर गेली, गुरुजी झाले बीएलओ…शिक्षणाचा झाला पोलिओ,

या मोर्चेची सुरुवात चार पुतळा (हुतात्मा चौक) येथून झाली.  बाबासाहेब आंबेडकर चौक – सिध्देश्वर प्रशाला समोरून मोर्चा निघत  जिल्हा परिषद पूनम गेट येथे त्याचे रूपांतर सभेत झाली. या सभास्थळी राज्य शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष म.ज. मोरे, जिल्हा संघाचे नेते बब्रुवाहन काशीद, राज्य सल्लागार मंडळाचे अध्यक्ष ल. हु. कांबळे,  राज्य सरचिटणीस संजय चेळेकर, जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पवार, सरचिटणीस सूर्यकांत हत्तूरे (डोगे), कार्यकारी अध्यक्ष रणजीत थिटे, कार्याध्यक्ष दिलीप ताटे,  कोषाध्यक्ष महादेव जठार, चंदाराणी आतकर आदींची भाषणे झाली.


*यांनी दर्शवला पाठिंबा*

या मोर्चेत माजी आमदार दिलीप माने यांनी सहभागी होऊन शिक्षकांच्या मागण्यांचे जोरदार समर्थन केले. मोर्चाला जुनी पेन्शन हक्क संघटना, एकल शिक्षक संघटना,  सांगोला तालुका आदर्श शिक्षक समिती, शिवाजीराव पाटील गट शिक्षक संघ, विश्वगामी अधिकारी व कर्मचारी संघटना, अल्पसंख्यांक अधिकारी व कर्मचारी संघटना, शिक्षक सहकार संघटना, कुळूर कैकाडी समाज संघटना, मराठा क्रांती मोर्चा विठ्ठल शुगरचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी उपस्थळी उपोषण स्थळी भेट देऊन संयुक्त शाळा योजना, शाळांचे खाजगीकरण, कॉन्ट्रॅक्ट बेसवर शिक्षकांची नियुक्ती आदी शासनाच्या योजना जनता मान्य करणार नसल्याचे सांगितले.

त्याचप्रमाणे शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले यांनी उपोषण स्थळी भेट देऊन शिक्षकांच्या राज्यस्तरावरील प्रश्न शासनास कळवून जिल्हास्तरावरील प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे सांगितले.

सभा संपल्यानंतर निवासी नायब तहसीलदार बालाजी बनसोडे यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चात बालचमुंनी सुद्धा सहभागी होऊन आमच्या गुरुजींना शिकवायला वेळ द्या अशा घोषणा दिल्या.


या मोर्चेत आप्पासाहेब देशमुख, ज्योतीराम बोंगे, विजय तडकलकर, अभिजीत सुर्डीकर, अशोक पवार, नागनाथ क्षीरसागर, राजेंद्र वायसे, सुहास कुलकर्णी, हरीभाऊ जाधव, सीता नामवार, गुलाबराव पाटील, हणमंत सरडे, तानाजी गुंड, सत्यवान जैनजांगडे, राजेंद्र आवारे, रमेश शिंदे, राणी लेंगरे, दमयंती पाटील, अश्विनी गोरड, रफिक मुलाणी, लक्ष्मीकांत तळवार, मल्लिकार्जुन सोमेश्वर, संजय इरवाडकर तालुका अध्यक्ष पंडीत साबा, परमेश्र्वर किणगी, संभाजी तानगावडे, मोहन अवताडे, दत्ता एडगे, राजेंद्र आवारे, सचिन देशमुख, संजय काशिद, महावीर उन्हाळे, विजय शिंदे आदींसह सुमारे 4000 हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते


मोर्चा यशस्वी होण्याकरिता ईरण्णा मैंदर्गी, प्रसिद्धी प्रमुख प्रमोद कुसेकर, प्रशांतसिंह रजपूत,  निवास माळी, अनिल म्हेत्रे, मधुकर राठोड, मनोहर एकतपुरे, फिरोज शेख, अनिल जाधव, विजयकुमार बंदिछोडे, लक्ष्मण वाघमोडे, आप्पा खरात आदींनी परिश्रम घेतले.

SendShareTweetSend
Previous Post

आता लिंगायत समाजही झाला आक्रमक ; सरसकट आरक्षणासाठी हा नेता करणार पायी पदयात्रा

Next Post

अरे व्वा ! सोलापूर जिल्हा परिषदेचे अभिनंदन ; तब्बल 138 कुटुंबाचे मिळणार ‘आशीर्वाद ‘ काय आहे वाचा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

अरे व्वा ! सोलापूर जिल्हा परिषदेचे अभिनंदन ; तब्बल 138 कुटुंबाचे मिळणार 'आशीर्वाद ' काय आहे वाचा

ताज्या बातम्या

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971239
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group