Sunday, April 12, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात सात दिवस जिल्हाधिकारी जाणार घरोघरी ; ग्रामीण भागावर राहणार सर्वाधिक फोकस

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 July 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर  :- महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा तसेच राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा. तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धींगत व्हावा, यासाठी 01 ऑगस्ट (महसूल दिन)  ते 07 ऑगष्ट या कालावधीत “महसूल सप्ताह” साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. या कालावधीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह सर्व उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, तलाठी हे ग्रामीण भागात घरोघरी जाणार आहेत.

“महसूल सप्ताह” निमित्त दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी महसूल दिन साजरा करण्यात येणार असून, महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तसेच  महाराजस्व अभियानातंर्गत केलेल्या कामाची दखल घेऊन महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव सन्मान करण्यात येणार आहे. जमीन महसूल अधिनियम कलम 155 खालील ई- हक्क पोर्टलवरील प्रलंबित प्रकरणे तलाठयामार्फत निकाली काढणेची कार्यवाही करण्यात येणार आहे. महाराजस्व अभियानातील गाव तिथे स्मशानभूमी, दफनभूमी सुविधा उपलब्ध करण्याबाबत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. दि. 2 ऑगस्ट 2023 रोजी युवा संवाद अतर्गंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक कारणासाठी आवश्यक दाखले व प्रमाणपत्रांचे  तत्काळ वितरण महाविद्यालय स्तरावर केले जाणार आहेत. विविध घटकांतील लाभार्थी विद्यार्थ्यांना केंद्र व राज्य शासनाद्वारे देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती व कार्यक्रमाबाबत माहितीपत्रके शाळा, महाविद्यालयांमध्ये वितरीत करुन अंमलबजावणी करण्यात येणार आहे.शालेय विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढणे अद्ययावत करणे यासाठी विशेष मोहिमेर्तंगत शाळेच्या ठिकाणी, स्वस्त धान्य दुकान, बँक, पोष्ट कार्यालय येथे आधार मशीन्स उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. जिल्हयातील शैक्षणिक संस्था तसेच मंडल स्तरावर व तालूका स्तरावर दाखले वाटपासाठी शिबीरे आयोजित करण्यात येणार आहेत.

तसेच  दिनांक 03 ऑगस्ट 2023 रोजी एक हात मदतीचा या अतर्गंत मान्सुन पुर्व व मान्सुन कालावधीत अवकाळी पाऊस,अतिवृष्टी, पूर यामुळे बाधित झालेल्या नागरिकांना देय असलेल्या सोई सुविधा, नुकसान भरपाई देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच पिक विम्यासाठी विविध दाखले तत्काळ तलाठीस्तरावर प्रदान करण्यात येणार आहेत. प्रत्येक मंडळ मुख्यालयामध्ये महसूल अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. दि.04 ऑगस्ट रोजी जनसंवाद कार्यक्रमार्तंगत महसूल अदालतींचे आयोजन करुन सर्व स्तरावरील अपिले निकाली काढण्यात येणार आहेत. सलोखा योजनेंतर्गत गावा-गावांतील व शेतातील रस्त्यांबाबत प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी शिबिरे आयोजन करण्यात येणार आहेत. आपले सरकार या पोर्टलवर तक्रारी निकाली काढणेबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे. दि. 05 ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमार्तंगत सैनिकांच्या विविध अडीअडचणींबाबत आढावा घेऊन तातडीने निराकरण येईल तसेच जमिनीचे तंटे, प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात येतील.

तसेच  06 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील महसूल संवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांची प्रलंबित सेवाविषयक बाबी निकाली काढणेत येतील. दिनांक 07 ऑगस्ट रोजी महसूल विभागामार्फत महसूल सप्ताह निमित्त घेतलेल्या विविध उपक्रमांबाबतची फलनिष्पत्ती व विशेष उल्लेखनीय कामकाजाची दखल घेण्यासाठी महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ आयोजित करण्यात येणार असल्याचे  जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.  

SendShareTweetSend
Previous Post

नूतन उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांचे लोकशासन पार्टीच्या वतीने स्वागत

Next Post

सोलापुरात भाजपला मिळाला इन शर्ट करणारा शहराध्यक्ष ; नरेंद्र काळे यांचा जोरदार पदग्रहण समारंभ ; कार्यकर्त्यांना केले हे भावनिक आवाहन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात भाजपला मिळाला इन शर्ट करणारा शहराध्यक्ष ; नरेंद्र काळे यांचा जोरदार पदग्रहण समारंभ ; कार्यकर्त्यांना केले हे भावनिक आवाहन

ताज्या बातम्या

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026
चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

5 April 2026
कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

4 April 2026
कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

29 March 2026
अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

27 March 2026
सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

25 March 2026
समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1974752
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group