राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड हे सोलापूर दौऱ्यावर होते, यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, प्रवक्ते रणजित बागल, मनोज गांवधरे, सचिन बागल यांनी भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी चालू हंगामातील FRP थकविली आहे , एकरकमी एफआरपी न देता एफआरपी मध्ये बेकायदेशीर तोडमोड करून एफआरपी देत आहेत , तसेच शेतकऱ्यांच्या शेतात ऊसाची रिकव्हरी जास्त लागते मात्र कारखान्यावर कमी लागते म्हणजे यात रिकव्हरी चोरी होते, तर काही साखर कारखान्यांनी मागील हंगामातील एफआरपी न देता बेकायदेशीर गाळप हंगाम सुरु आहेत अशी तक्रार संघटनेने केली आहे.

















