सोलापूर : मराठा आरक्षणाची लढाई समाजाने आणखी तीव्र केली आहे मनोज रंगे पाटील यांचे दिवसेंदिवस तब्येत खालावत चालली असताना दुसरीकडे सरकारकडून जरांगे पाटील यांना अपेक्षित निर्णय होताना दिसत नाही त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. सोलापुरातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे यांनी आपल्या कार्यालयावरील पक्षाचे सर्व बॅनर हटवले आणि मराठा क्रांती मोर्चा आरक्षण मागणीचे बॅनर लावले आहेत.
यामागील भूमिका स्पष्ट करताना शिंदे म्हणाले, प्रथम मी मराठा आहे नंतर माझा पक्ष आहे. एकीकडे मराठा समाजाला आरक्षणासाठी लढाई सुरू असताना मी माझ्या कार्यालयावर पक्षाचा लावणे गैर आहे जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत या कार्यालयातून राजकारण होणार नाही अशी ठाम भूमिका मांडली.