नांदेड जिल्ह्य़ातील बोंडार गावाचे भिम सैनिक अक्षय भालेराव हत्येच्या निषेधार्थ सोलापूर येथील भिम सैनिक तरुण, युवक, महिला, माता बघीनी, सर्व भिम सैनिक, भिम वाघीणी, अन्याय अत्याचार विरोधी संघटनच्या माध्यमातून पक्ष विरहित शुक्रवार ९ जून २०२३ रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
हा मोर्चा डाॅ बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणाहून डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून निघणार आहे, हा मोर्चा सिद्धेश्वर मंदिर सिद्धेश्वर प्रशाला समोरून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनम गेट समोर येणार आहे त्या ठिकाणी या मोर्चाचे रूपांतर सभेत होईल असे सांगण्यात आले. या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.


















