सोलापूर : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे मागील सहा दिवसांपासून बेमुदत आमरण उपोषण करत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आंदोलन सुरू झाले आहे.
सोलापुरातही जिल्हाधिकारी कार्यालय समोर मागील सहा दिवसांपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. सोमवारी माजी आमदार दिलीप माने, माजी महापौर मनोहर सपाटे यांनी त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवत पाठिंबा दिला.
मराठा आरक्षणासाठी समाज पेटून उठलेला आहे, सरकारने कोणताही विलंब न करता तात्काळ आरक्षण द्यावे, मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये असा इशारा यावेळी नेत्यांनी राज्य सरकारला दिला.



















