आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर उत्तर मधील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे टिफिन संमेलन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या राजवाडे चौकातील संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. या टिफिन संमेलनास भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते तुळशीदास भुतडा, मल्लेशअप्पा कावळे, पांडुरंग दिड्डी, रामभाऊ तडवळकर, संघटन सरचिटणीस रुद्रेश बोरामणी, अंबण्णा बिंगी, नाव्हकर काका, विठ्ठल बडगंची, नरसिंग मेंगजी, प्रभाकर जामुंडे, रोहिणी तडवळकर, मोहिनी पत्की,देविदास चेळेकर आदी उपस्थित होते.
या टिफिन संमेलनाच्या अनुषंगाने जेष्ठ कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी मधील अनेक प्रसंगावर आपले मनोगत व्यक्त करत आमदार विजयकुमार देशमुख यांनी पुन्हा आम्हाला एकत्र केल्याबद्दल आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ कार्यकर्ते राम तडवळकर यांनी केले प्रस्तावनेमध्ये टिफिन संमेलन आयोजनामागील उद्देश त्यांनी स्पष्ट केला..
सोलापूर शहर उत्तर मधील भारतीय जनता पार्टी मधील सर्व ज्येष्ठ मंडळींनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या समवेत भोजनाचा आस्वाद घेत भारतीय जनता पार्टी मधील अनेक किस्से सांगत मनमोकळे केले.
यावेळी नागेश ढवळे, जगदीश कोरे, सुरेश झेंडेकर, रमेश दुलंगे, राजू पुजारी, बसवराज डुमणे, मोहन झुंजे, नागनाथ सोमा, राजकुमार साखरे, आप्पा कारंडे, बसवराज इटकळे, लक्ष्मण गायकवाड, उमाकांत बेलुरे, भीमाशंकर धनाळी, बाळकृष्ण पतंगे, गजानन होमकर, धोंडीबा हिबारे, सिद्धाराम कोंडे, नरेंद्र काळे, सतीश कुदळे, प्रशांत फत्तेपूरकर, देविदास बनसोडे यांच्यासह भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर उत्तर मधील शेकडो जेष्ठ मंडळी उपस्थित होते.


















