सोलापूर -“आझादी का अमृत महोत्सव”स्वच्छता हू सेवा व ‘मेरी माटी, मेरा देश’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 1019 ग्रामपंचायतींमध्ये मंगळवारी (दि. २६) अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील 1019 ग्रामपंचायती मधील विद्यार्थी व ग्रामस्थ सहभागी झाले होते. अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांच्या मार्गदर्शनाखाली 1141 गावात 1022 अमृत कलशाची मध्ये आज पडत्या पावसात प्रभात फेरी काढत अमृत कलशची 1151 गावात मिरवणूक काढण्यात आली. स्वच्छता ही सेवा अंतर्गत प्लास्टिक मुक्त करणे साठी जनजागरण तर कचरा मुक्त भारत.. कचरा मुक्त सोलापूर जिल्हा चा नारा देत लाखो ग्रामस्थ व विद्यार्थी सहभागी झाले होते.
माझी वसुंधरा अभियान, आझादी का अमृत महोत्सव, मेरी माटी मेरा देश, “स्वच्छता या सेवा” उपक्रमांची आद जिल्हयात प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली असून अमृतकलश यात्रेतून जिल्ह्यातील 1 हजार 25 ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता संदेश, घोषवाक्ये, जलप्रदूषण, ओला व सुका कचऱ्यासाठी निळा व हिरवी डस्टबीन (कचराकुंडी) ठेवणे बाबत जनजागृती करणेत आली. अमृत कलशसाठी प्रत्येक घरातून माती संकलन करणेत आले. माता भगिनी मूठभर माती देऊन देशा साठी समर्पण भावनेने सहभागी झाले होते. पंचप्राण शपथ, स्वच्छता शपथ, माझी वसुंधरा शपथ, देणेत आली.
आज गावा गावात विविध उपक्रम राबवून कलश मिरवणूक काढण्यात आली. या कलशमधून प्रत्येक गावातील माती गावात संकलित करणेत आली असून तालुका स्तरावर कलश संकलित करणेत येत आहे.
२६ सप्टेंबर रोजी हा उपक्रम जिल्ह्यातील सकाळी ८ वाजले पासून या उपक्रमास सुरूवात झाली. आज दिवस भर पावसाची रिपरिप सुरू होती. पडत्या पावसात लाखो ग्रामस्थ व विद्यार्थी सहभागी झाले होते.
गावातील बचत गट ,गणेश मंडळे, राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी पथक ,एनसीसी चे विद्यार्थी ,नेहरू युवा मंडळीचे स्वयंसेवक सहभागी झाले होते. सकाळी माध्यमिक व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढणेत आली. स्वच्छता ही सेवा अंतर्गत प्लास्टिक बाबत जनजागृती करणेत आली.
दि. २७ सप्टेबर रोजी सफाई मित्रांचा सन्मान ..!
………………….
सफाई कर्मचारी यांचा दि. २७ सप्टेबर रोजी सफाई मित्रांचा सन्मान सन्मानपत्र देऊन करणेत येणार आहे. सफाई मित्र गेल्या अनेक वर्षा पासून योगदान देत आहेत त्यांचा कुटूंबासह गौरव तालुका स्तरावर करणेत येणार असेही उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी सांगितले .
माझी वसुंधरा अभियानाचा गावा गावात जागर …
………………….
माझी वसुंधरा जिल्ह्यातील सुमारे 1025 ग्रामपंचायती मध्ये जागर करणेत आला. या निमित्ताने माझी वसुंधरा चा लोगो ग्रामपंचायतीच्या ठिकाणी काढणेत आसा होता.माझी वसुंधराची शपथ आज हजारो ग्रामस्थांनी घेतली. या निमित्ताने हा जागर जिल्ह्सात सुरू असून हे सर्व कार्यक्रम १ नोव्हेबर पर्संत सुरू राहणार आहेत. , अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे यांनी दिली.
ठळक वैशिष्ट्ये
✅ जिल्ह्यातील १०२२ ग्राप मध्ये विशेष स्वच्छता अभियान
✅ जिल्ह्यात ११४१ कलशात माती संकलित
✅ १०२२ ग्रामपंचायती मध्ये अमृतवाटिके द्वारे २२ हजार ३३४ वृक्षारोपन करणेत आले.
✅ २७०० प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळांची प्रभात फेरी
✅ ११४१ गावात अमृत कलशाची मिरवणूक
✅ स्वच्छता ही सेवा , माझी वसुंधरा व मेरी माटी मेरा देश ची शपथ उपक्रमांत पाच लाखा पेक्षा अधिक विद्यार्थी व ग्रामस्थांनी घेतली शपथ