सोलापूर : पोलीस आयुक्तालयाच्या विशेष पथकाने काही दिवसांपूर्वी भवानी पेठेत फ्रुट बियर बनविणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून दहा लाखापेक्षा अधिक साठा जप्त केला होता, त्याच पार्श्वभूमीवर एमआयडीसी व सदर बझार पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तीन ठिकाणी छापा मारून फ्रुट बियर विक्रीचा सुमारे 15 हजाराच्या फ्रुट बियरच्या बाटल्या जप्त केल्या.
१) जगदिश विजयकुमार येमुल, वय ३८ वर्षे, रा.घर नं १०९ न्युपाच्छा पेठ, अशोक चौक, सोलापूर २) वेणुगोपाल देवीदास कोंका, वय ४४ वर्षे, रा. साईबाबा चौक, सोलापूर
३)प्रकाश विठ्ठल कोळी, वय ५२ वर्षे, रा. एकात्मता विकास नगर, कुमठा नाका, सोलापूर, ४) मोहन पूर्ण नाव नाही,
५)शिवाजी मल्हारी सुरवसे, वय ४३ वर्षे, रा. घर नं. १४३/१९४४ कोनापुरे चाळ, आंबेडकर शाळेच्या पाठीमागे, रेलवे लाईन, सोलापूर ६) मोबीन शेख असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एमआयडीसी पोलिसांनी हा छापा सत्यविजय मंगल कार्यालयाशेजारी, प्लॉट नं. डी. ४५. एम आय डीसी. सोलापूर तसेच सदर बझार पोलिसांनी
एकात्मता विकास नगर, कुमठा नाका, कोनापुरे चाळ, आंबेडकर शाळेच्या पाठीमागे रेल्वे लाईन, याठिकाणी छापा मारून कारवाई केली.

















