माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याचे समर्थन करताच मंगळवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन आमदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.
आमदार प्रणिती शिंदे यांना रक्त पाहिजे की रक्तातला भिमराव पाहिजे हे अगोदर त्यांनी स्पष्ट करावं असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते नाना कदम यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.

















