सोलापूर : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित सर्व अधिकारी आमदारांना मार्गदर्शन केले. अधिकाऱ्यांना उपदेशाचे डोस देताना सोलापूर जिल्ह्याला विकासात पुढे न्यायची जबाबदारी ही सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे आहे.
त्यामुळे विकासाच्या कामात योगदान द्या, हलगर्जीपणा कराल तर तुमचा कार्यक्रम ही होईल असा उपदेशाचा डोस देताना कुठला माहिती अधिकार वगैरे आला तरी घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हे सुरक्षा कवच ही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना या कामात आवश्यकते बैठका घेण्याचे अधिकार पालकमंत्र्यांनी दिले त्या बैठकांना सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.



















