दक्षिण सोलापूर प्रभारी तहसीलदार पदाचा कार्यभार मंद्रूपचे अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांना देण्यात आला असून लिंबारे यांचे सुट्टीच्या दिवशीही कामकाज पाहून नागरिकांनी कौतुक करत आहेत.
प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी आदेश काढून तहसीलदार दक्षिण सोलापूरच्या प्रभारी तहसीलदार या पदाचा कार्यभार मंद्रूपचे अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांना दिला. राजशेखर लिंबारे यांनी दिनांक 11 मे 2023 रोजी कार्यभार स्वीकारून त्वरित संजय गांधी निराधार अनुदान समितीचे अधिकारी व कर्मचारी यांची सभा घेऊन प्रलंबित प्रकरणाचा आढावा घेऊन शनिवार व रविवार दोन दिवस सुट्टीच्या दिवशी कार्यालयात उपस्थित राहून विशेष सहाय योजनेअंतर्गत येणाऱ्या संजयगांधी, श्रावणबाळ, राष्ट्रीय वृद्धापकाळ व विधवा या प्रकरणातील सर्व कागदपत्रे तपासणी करून पात्र, अपात्र यादी तयार करणे बाबत सूचना दिल्या.
त्यानंतर त्वरित 15 मे रोजी संजयगांधी निराधार अनुदान समितीची बैठक घेऊन संजय गांधी निराधार योजनेचे 73, लाभार्थी, श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेचे 107, राष्ट्रीय विधवा योजनेचे 20, राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेचे 28, असे एकूण 228 पात्र लाभार्थ्याचे प्रकरणे मंजूर करण्यात आलेले आहेत. तसेच राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे 7 प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. सदर संजय गांधी योजना बैठकीस नायब तहसीलदार आरती दाबडे, अवल कारकून परवीन रंगरेज, महसूल सहाय्यक एस एल कुलकर्णी, तसेच आय टी असिस्टंट श्रेयस देशपांडे हे उपस्थित होते.
तहसिलदार पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अशा निराधारांची प्रलंबित प्रकरणाकडे लक्ष दिले. तब्बल 228 प्रकरणे मंजूर झाली हे मला त्या निराधार आणि गोरगरिबांचे एकप्रकारे आशिर्वाद मिळाला हे माझ्या कामाचे समाधान आहे.


















