सोलापूर : 31 डिसेंबर नववर्षाच्या पूर्वसंध्येसाठी सध्या देशी विदेशी दारूची अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाहतूक होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) असाच मोठा दारूचा साठा जप्त केला होता.
याच पार्श्वभूमीवर शनिवारी बोरामणी नाका (Boramani Naka) येथे कर्तव्यावर असणारे शहर वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल विनोद बनसोडे यांनी एक चारचाकी वाहन संशयरित्या जात असताना मिळून आल्याने त्या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये देशी-विदेशी अवैद्य मद्यसाठा मिळून आल्याने पुढील कारवाईसाठी चार चाकी वाहन जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एम एच 13 ए झेड 9223 या क्रमांकाची पांढऱ्या रंगाची टाटा सुमो पकडण्यात आले आहे त्यामध्ये हा देशी-विदेशी मद्याचा साठा होता.

















