सोलापूर : शहरातील विजापूर नाका परिसरातील दोन नंबर झोपडपट्टी येथील चांद तारा मस्जिद जवळ एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन मोठी वित्तहानी झाली सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
चांद तारा मस्जिद जवळ दोन नंबर झोपडपट्टी मध्ये राहत असलेल्या निलाबाई जंगम यांच्या घरात सकाळच्या सुमारास चहा करताना सिलेंडर पेट घेतल्यानंतर घरातील सर्व बाहेर पळाले त्यानंतर त्या सिलेंडरचा स्फोट झाला परिसरातील नागरिकांनी याची माहिती मिळताच पेटलेले सिलेंडर विझवले. स्फोटानंतर घरातील काय चित्र होते पहा या व्हिडीओ मधून
अधिक माहिती घेतली असता शिवशंकर जंगम यांच्या घरात 25 नोव्हेंबर 2021 रोजी गिरीधर गॅस एजन्सी कडून हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे गॅस सिलेंडर आले होते सिलेंडर जुने असल्याने त्याला चिरा पडल्या होत्या त्यामुळे आतील गॅस लीक होऊन सिलेंडरने पेट घेतला अशी माहिती निलाबाई जंगम यांनी दिली जंगम कुटुंबीय गरीब असल्याने त्यांच्या घराचे या स्फोटामुळे मोठे नुकसान झाले आहे. घरातील संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे परिसरातील नागरिकांनी संबंधित गॅस कंपनीने त्यांच्या घराचे झालेले नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.


















