पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथील शेतकरी रामदास लाडजी देशमुख हा शेतकरी जर्सी गाई पाळून व शेती करून आपली उपजीविका भागवत होता. या शेतकऱ्याने जर्सी गाई घेण्यासाठी व इतर कामासाठी काही खाजगी सावकाराकडून पैसे घेतले होते परंतु व्याज मुद्दल देऊन सुद्धा तो खाजगी सावकार त्याला धमक्या देत होता. घरी जाऊन बसत गुरे ओढून नेण्याचे धमकी देत होते, या त्रासाला कंटाळून व दारातील जर्सी गाई ओढून नेल्या तर गावामध्ये मानहानी होईल या भीतीने त्याने गुरुवारी सकाळी विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
शेजारील लोकांनी त्याला तात्काळ पंढरपूर येथील विठाई हॉस्पिटल येथे आणून ऍडमिट केले आहे त्याची प्रकृती चिंताजनक असून पंढरपूर तालुका पोलीस पुढील तपास करीत आहेत.
ही बातमी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर यांना समजली त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी दाखल होत त्याच्या कुटुंबीयांना धीर दिला व तुमच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा असून कुठल्याही खाजगी सावकाराच्या दडपशाहीला भिऊ नका आपण पोलिसात तक्रार करू व न्याय मिळवू देऊ असा धीर देत सोलापूर जिल्हा पोलीस प्रमुखांनी खाजगी सावकाराविरुद्ध मोहीम उघडून सर्वसामान्य जनतेला या सावकाराच्या जाचातून वाचवावे असे आवाहन केले.




















