सोलापूर : राज्यात झालेल्या विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीदर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाल्याबद्दल सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महाविकास आघाडीच्या तीनही पक्षाच्या वतीने शुक्रवार 03 फेब्रूवारी रोजी सकाळी 11:30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाके फोडून मिठाई वाटपासह गुलाब पाकळ्यांची उधळण करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजीने सारा परिसर दणाणून गेला होता…
काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष पवार, संजय हेमगड्डी, शिवसेना शहराध्यक्ष विष्णू कारमपुरी, विनोद भोसले, शफी इनामदार, गणेश डोंगरे, बाबा करगुळे, हेमा चिंचोळकर, सुनीता रोटे, विद्या काळे, जुबेर बागवान, वाहिद विजापुरे, शोहेब महागामी, युवराज जाधव, आनंद मुस्तारे, रॉकी बंगाळे, तिरुपती परकीपंडला, सुभाष वाघमारे यांच्यासह तिन्ही पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

















