सोलापूर : पहिल्याच पावसाने सोलापुरात नागरिकांची दाणादाण उडवून दिली, दुपारी सव्वातीन वाजता सुरू झालेला पाऊस पाच पर्यंत कोसळत होता. त्यानंतर शहरात पावसाची भुरभुर कायम राहिली. या पावसाने सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावल्याचे सांगण्यात आले. अनेक सखल भागात पाणी साचले होते, रस्त्यावरून पाणी वाहत होते.
मंगळवार बाजार परिसरातील गणेश शॉपिंग सेंटर समोर झालेल्या पावसाने रस्त्याला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. या भागातील पेट्रोल पंपात तर कमरे एवढे पाणी थांबले होते. गणेश शॉपिंग सेंटर मध्ये वेगवेगळे इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक दुकाने असल्याने त्या ठिकाणी कायम गर्दी असते. सगळे रस्त्यावर वाहने लावून वर दुकानांमध्ये जातात. या दुपारी झालेल्या पावसामुळे अनेकांची दुचाकी वाहने पाण्यात बुडाली होती काहीची वाहने तर पाण्यात वाहून जाताना दिसताच. नागरिकांनी त्या गाड्या अडवल्या, एकमेकांना मदत ही केली. यावेळी नागरिकांची चांगलीच तारांबळ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.

















