सोलापूर : महाराष्ट्रात झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या तीन पक्षाच्या महाविकास आघाडीने चांगले यश संपादन केले त्याबद्दल सोलापुरात महाविकास आघाडीच्या वतीने डॉक्टर आंबेडकर चौकात जल्लोष करण्यात आला. यावेळी प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी, मुंबईतून पळालेला भाजप नागपूर मध्ये आहे, तुमच्या घरात येऊन आम्ही या निवडणुकीत यश मिळवले त्यामुळे भारतीय जनता पार्टीची उलटी गिनती सुरू झाल्याचे सांगत भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिले. तुम्ही उद्या महापालिकेच्या निवडणुका लावा, आमचे तिन्ही पक्ष मिळून भारतीय जनता पार्टीला सत्तेतून खाली खेचून महाविकास आघाडीचा झेंडा फडकवतील.

















