सोलापूर : नागरिकांना सर्व दाखले एकाच छताखाली मिळण्याचे केंद्र म्हणजे सेतू सुविधा केंद्र ते बंद होऊन त्या जवळपास दोन महिने होऊन गेली आहेत. सेतू केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी जोर वाढला असताना प्रशासनाने दहा दिवसाचे शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत महाशिबिर घेऊन सुमारे सह हजार पेक्षा जास्त दाखले वितरित केले. महा-ई-सेवा केंद्र मधून दाखले मिळण्यास विलंब तसेच नागरिकांची आर्थिक लुटमार होत असल्याने सेतू केंद्र सुरू करण्यात कडे जोर वाढला आहे.
या पार्श्वभूमीवर प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी सोमवारी सेतू निविदा समितीची बैठक घेऊन सेतू केंद्र सुरू करण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविण्याच्या सूचना दिल्या. येत्या आठ दिवसात टेंडर प्रक्रियेची जाहिरात निघणार असून दोन ते तीन महिन्यात सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन सेतू केंद्र पुन्हा कार्यान्वित होईल अशी माहिती जिल्हाधिकारी ठोंबरे यांनी दिली.
जिल्हा प्रशासनाच्या 154 मंडलाधिकारी, अव्वल कारकून, कारकून यांच्या बदली संदर्भात शनिवार रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात समुपदेशन घेण्यात आले. त्यानुसार 31 मे रोजी सर्व 154 कर्मचाऱ्यांचा बदलीची ऑर्डर निघेल अशी माहिती ठोंबरे यांनी दिली.


















