कामगारांच्या कल्याणासाठी सातत्याने लढा देणाऱ्या महाराष्ट्र चळवळीचे जनक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र, दमाणी नगर, सोलापूर असे महाराष्ट्र शासनाने देवून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या बहुमोल कार्याचा गौरव करण्यात यावा. या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना मातंग एकता आंदोलन सोलापूर शहर युवक जिल्ह्याच्या वतीने संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष महेश लोंढे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी निवेदन देताना युवा नेते सुरज शिंदे, विजय भोसले, गणेश वाघमारे, अभिजीत डोलारे, दीपक करकी समाधान मोरे, अभिजीत सोनवणे, अजय बोराडे आदीं होते.
कामगारांना संघटित करण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांनी लालबावटा पथक तयार केले. या पथकाच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी कामगारांवर होणाऱ्या अन्यायाचा वाचा फोडली. कामगारांचा अमानुषंपणे होणारा छळ थांबविणेसाठी स्वतः अण्णाभाऊंनी कामगारांना जागृत करून शाहीरी व पोवाडे व लोकनाट्याच्या माध्यमातून कामगारांच्या व्यथा समाजासमोर मांडल्या व “ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती इथल्या कामगारांच्या, कष्टकर्यांच्या तळहातावर तरलेली आहे.” अशा प्रकारे अण्णाभाऊंनी कामगारांच्या कष्टाचा महत्व आपल्या विचारातून जगासमोर मांडले असे मत युवक जिल्हाध्यक्ष महेश लोंढे यांनी सादर केला आहे.



















