सोलापूर : 11 ऑगस्ट रोजी पुकारण्यात आलेल्या बंद मध्ये व्यापाऱ्यांनी सहभागी होऊनये असं आवाहन श्रीराम सेनेच्या वतीने करण्यात आले आहे,
केंद्रातील भाजपाचे सरकार सर्वसामान्याच्या हिताचे निर्णय घेत असताना काही राज्यातील अल्पसंतुष्ट, आप मतलबी नेते खासकरून राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी 11 ऑगस्ट रोजी बंद पुकारला आहे,
करोना महामारीच्या काळात व्यापारी मेटाकुटीला आला होता ,आता कुठे बाजार पेठेचे अर्थकारणाचे चक्र स्थिरावत असताना शरद पवार आणि त्याच्या सारख्या स्वार्थी नेत्यानी जाणीवपूर्वक हिंदु सणासुदीच्या काळात बंद आवाहन केले आहे , तेव्हा राज्यभरातील व्यापाऱ्यांनी 11 ऑगस्टच्या बंद मध्ये आपला सहभाग नोंदवूनये ,श्रीराम सेना आपल्या पाठीशी खंबीर पणे उभी आहे असं पत्रक काढून व्यापाऱ्यास आवाहन श्रीराम सेनेचे नेते राजकुमार पाटील यांनी केले आहे.


















